esakal | 'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'शिक्षक पर्व' सम्मेलनाला संबोधित करणार आहेत. शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या 'शिक्षण पर्व' दरम्यान पंतप्रधान नरेंद्र शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील इतर योगदानकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मोठ्या घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'शिक्षक पर्व' सम्मेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच उपक्रमांचा शुभारंभ करणार आहेत. यामध्ये १०,००० शब्दांचा भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश, बोलकी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ पुस्तके), सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क (SQAAF), NIPUN भारतसाठी NISTHA शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि शाळेच्या विकासासाठी स्वयंसेवक, देणगीदार आणि सीएसआर योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी विद्यांजली पोर्टल या उपक्रमांचा समावेश आहे.

शिक्षकांचे मोलाचे योगदान आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे एक पाऊल पुढे नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने यंदा 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व सम्मेलनाचं आयोजन केलं आहे. यामध्ये आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणा आहेत. यंदाची थीम "गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतात शाळांमधून मिळणारे ज्ञान" अअसी आहे.

loading image
go to top