central vista
central vistasakal media

पंतप्रधान मोदी गुरुवारी करणार सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन

Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता इंडिया गेट येथे हा कार्यक्रम होणार आहे.

central vista
BMC : शहांची आक्रमक भूमिका शिवसेनेच्या पथ्यावर? BJPला शरद पवारांचा पूर्वानुभव

सर्वप्रथम, इंडिया गेटच्या मागे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अनेक दशकांपूर्वी राजा पाचवा जॉर्ज यांचा पुतळा ज्या छताखाली ठेवण्यात आला होता, तिथे सुभाषचंद्रा बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यानंतर पीएम मोदी इंडिया गेटजवळ बांधलेल्या स्टेप्ड प्लाझाची पाहणी करतील. येथे NDMC ची मुले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

त्यानंतर पंतप्रधान कॅनॉल ब्रिजकडे जातील, तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. यानंतर, पंतप्रधान एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी पंतप्रधानांचे मंचावर स्वागत करतील. नेताजी बोस यांच्याविषयी दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. रात्री ८ वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. रात्री 8.30 वाजता नेताजी बोस यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो सादर करण्यात येईल.

central vista
सैन्यभरती आधीच दोन गटात ‘युद्ध’; भरतीची तयारी करणाऱ्या दोन गटांमध्ये गोळीबार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीच्या काही भागात वाहतूक निर्बंध लागू राहतील. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू 8 सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि नवी दिल्लीतील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ठराविक रस्त्यांवर सामान्य वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com