Heeraben Modi : PM मोदींच्या आई असूनही रांगेत उभ्या राहिल्या होत्या हीराबेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heeraben Modi

Heeraben Modi : PM मोदींच्या आई असूनही रांगेत उभ्या राहिल्या होत्या हीराबेन

PM Modi's Mother Heeraben Stands In Queue : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं वयाच्या १०० व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मोदींचं आईवर विशेष प्रेम होतं. ते वेळोवेळी आईला भेटायला जात असतं. त्यांच्या भेटीचे फोटो, आठवणी यातून त्यांच्या व आईच्या नात्यातला जिव्हाळा प्रकट होतो.

पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा सांगितलं आहे की, त्यांची आई कधीही त्यांच्या निर्णयाच्या आड आलेली नाही. उलट कायमच त्यांचा आधार आणि साथच लाभली आहे. याचं मूर्तीमंत उदाहरणच जणू नोटबंदीच्या काळात मिळालं.

रांगेत उभ्या होत्या पंतप्रधान मोदींची आई

नोटबंदीच्या निर्णयावरून देशभरातून बरेच सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रीया समोर आल्या. मोदींना मोठ्याप्रमाणात टिकेलाही सामोरं जावं लागलं. याकाळात जिथे संपूर्ण देशच ५०० आणि १००० च्या नोटा बदलवून घेण्यासाठी जेव्हा रांगेत उभे राहत होते; त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या आईनेही अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांच्या रांगेत लागून नोटा बदलवून घेतल्या. यावेळी त्यांचे फोटो, ट्वीट बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाले होते.

१०० व्या वर्षीही केले मतदान

संपूर्ण आयुष्य कष्टाने घालवलेल्या हीराबेन अखेर पर्यंत कार्यरत होत्या. त्या कायमच स्वतःची कामं स्वतः करायच्या. देशाच्या नागरीक म्हणून कायमच त्यांनी आपली कर्तव्य बजावली. अगदी वयाच्या शंभरीतही त्या व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यास गेल्या होत्या.