esakal | PM Modi Speech:लॉकडाऊन संपला, कोरोना नाही; पंतप्रधान मोदींनी दिली काळजी घेण्याचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi speech live updates

जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी देशाला 7 वेळा संबोधित केलं आहे. 19 मार्चनंतर 24 मार्चला केलेल्या भाषणावेळी मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 

PM Modi Speech:लॉकडाऊन संपला, कोरोना नाही; पंतप्रधान मोदींनी दिली काळजी घेण्याचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे नियम जुलै महिन्यापासून शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. 19 मार्चला मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी देशाला 7 वेळा संबोधित केलं आहे. 19 मार्चनंतर 24 मार्चला केलेल्या भाषणावेळी मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 

live update

 • जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत सर्व भारतीयांनी खूप मोठा काळ घालवला
 • वेळेसोबत आर्थिक व्यवहार वाढत आहेत
 • अनेक लोक त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत.
 • सणासुदीच्या काळात बाजारातही झगमगाट दिसत आहे
 • आपल्याला विसरून चालणार नाही की लॉकडाऊन गेलं पण व्हायरस अजुन गेलेला नाही
 • प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे देशात कोरोनाची स्थिती सावरली
 • रिकव्हरी रेट वाढला आहे
 • दर दहा लाख लोकसंख्येमागे पाच हजारांना कोरोना तर इतर देशांमध्ये हाच आकडा 25 हजार
 • दहा लाखांमागे मृत्यू दर 83 तर ब्रिटनसारख्या देशांमध्ये हाच आकडा 600 पेक्षा जास्त आहे
 • विकसित, प्रगत देशांपेक्षा भारताला जास्त यश
 • कोरोनाची व्हॅक्सिन प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार तयारी करत आहे
 • प्रत्येक नागरिकाला व्हॅक्सिन पोहचवण्यासाठी वेगाने काम
 • जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत शिथिलता नाही
 • थोडासा बेजबाबदारपणा आपल्या आनंदाला नाहीसं करू शकतो.
 • सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाच्या काळातले प्रोटोकॉल, मास्क लावणं कटाक्षाने पाळा
 • सणांमुळे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा यासाठी तुम्ही काळजी घ्या
 • नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या देशवासियांना शुभेच्छा
loading image
go to top