राहुल गांधींच्या वाढदिवशी मोदींनी दिल्या दिर्घायुष्याच्या शुभेच्छा!

टीम ईसकाळ
बुधवार, 19 जून 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना शुक्षेच्छा दिल्या आहेत. 

मोदींनी ट्विट करत राहुल यांना शुभेच्छा दिल्या. 'राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य देवो.’ असे ट्विट केले आहे.

युवक काँग्रेस, मायावती, ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, उर्मिला मातोंडकर, रामविलास पासवान, विजय गोयल, के सी वेणूगोपाल, नगमा, सत्यजीत तांबे, संजय निरूपम यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला होता, तर वोयनाडस लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narednra Modi wishes Rahul Gandhi on his birthday