
केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
अहमदाबाद -‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ झालेल्या गुजरातमधील केवाडियाचे नाव आता रेल्वेच्याही नकाशावर आले आहे. केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
मोदी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. केवाडियाला भारतभरातील पर्यटकांना येणे सोयीचे जावे, यासाठी रेल्वेगाड्या सुरु करतानाच मोदी यांनी तीन रेल्वे स्थानकांचेही उद्घाटन केले. ते म्हणाले, ‘‘एकाच ठिकाणाला जोडणाऱ्या इतक्या रेल्वेगाड्यांचे प्रथमच एकाच वेळी उद्घाटन झाले असावे. आज केवाडिया हे गुजरातमधले छोटेसे गाव राहिलेले नाही. नवीन रेल्वे मार्गांमुळे स्थानिक लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. रेल्वे ही पर्यावरणपूरक असावी, या केंद्र सरकारच्या धोरणाचे नवीन केवाडिया रेल्वे स्थानक हे उदाहरण आहे.’’
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यांचेही उद्घाटन
तीन नवीन रेल्वे स्थानके : दाभोई, केवाडिया, चंदोद
दाभोई-चंदोद ब्रॉड गेज
चंदोद -केवाडिया ब्रॉड गेज
विद्युतीकरण झालेला प्रतापनगर- केवाडिया मार्ग
ही शहरे केवाडियाला जोडली जाणार
अहमदाबाद, वाराणसी, मुंबई, हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली), रेवा, चेन्नई, प्रतापनगर (बडोदा).
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘लिबर्टी’ला टाकले मागे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला २०१८ पासून जवळपास ५० लाख पर्यटकांनी भेट दिली. याबाबतीत अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’लाही मागे टाकले आहे. केवाडियाला जोडणारे जाळे आता समृद्ध झाले असल्याने भविष्यात या ठिकाणी दररोज एक लाख पर्यटक भेट देतील, असे मोदी म्हणाले.