HappyBirthdayPM : मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर या काळात 'सेवा सप्ताह' आयोजित केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छता मोहित राबविण्यात येत आहे. तर, भाजप नेते मनोज तिवारी यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोठा लाडू बनवून त्यावर कलम 370 आणि 35 अ असे लिहिले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर या काळात 'सेवा सप्ताह' आयोजित केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छता मोहित राबविण्यात येत आहे. तर, भाजप नेते मनोज तिवारी यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोठा लाडू बनवून त्यावर कलम 370 आणि 35 अ असे लिहिले आहे. 

भाजपच्या प्रमुख नेत्यांसह अन्य पक्षातील राजकीय नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोदींना परदेशातूनही अनेक देशांच्या प्रमुखांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi 69th birthday celebration