esakal | पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा बोलणार, आता काय?
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा बोलणार, आता काय?

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सांगितले आहे, की आज रात्री (24 मार्च) आठ वाजता राष्ट्राला उद्देशून मी संदेश देणार आहे. जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा बोलणार, आता काय?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूचा झालेला उद्रेक पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी काय पाऊले उचलण्यात येणार हे रात्री स्पष्ट होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सांगितले आहे, की आज रात्री (24 मार्च) आठ वाजता राष्ट्राला उद्देशून मी संदेश देणार आहे. जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तेच मी देशातील नागरिकांसोबत शेअर करणार आहे.

मोदींनी नुकतेच असाच राष्ट्राला उद्देशून संदेश देत रविवारी (22 मार्च) जनता कर्फ्युची घोषणा केली होती. तसेच सायंकाळी पाच वाजता देशातील हिरोंना टाळ्या, थाळ्या किंवा शंखनाद करून सलाम करण्यास सांगितले होते. नागरिकांनी मोदींच्या या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत बंद ठेवला होता. मात्र, नागरिकांना रस्त्यावर एकत्र येत टाळ्या, थाळीनाद केला होता. यावरून नाराजी दर्शविण्यात आली होती. आता मोदी पुन्हा एकदा ऱाष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या पार गेला आहे. 

loading image
go to top