PM Modi: वो अब चल चुके हैं, वो अब...शेरोशायरीतून PM मोदींचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधींनी केलेल्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरोशायरीतून उत्तर दिलं
PM Narendra Modi attacks Rahul Gandhi on poetry Budget Session 2023
PM Narendra Modi attacks Rahul Gandhi on poetry Budget Session 2023

संसद सदनात मागील काही दिवसांपासून अदानी प्रकरणावरुन गदारोळ सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल संसद सभागृहात अदानी, मोदींवर अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. तर आज राहुल गांधींनी केलेल्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरोशायरीतून उत्तर दिलं आहे. (PM Narendra Modi attacks Rahul Gandhi on poetry Budget Session 2023 )

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता काव्यात्मक पद्धतीने त्यांच्यावर हल्ला चढवला.

काय म्हणाले मोदी?

ते म्हणाले की, मी काल पाहत होतो की काही लोकांच्या भाषणानंतर त्यांचे समर्थक उड्या मारत होते. कौतुक करत होते. काही जण ये हुई ना बात असही म्हणत होते. कदाचित त्यांना झोपही चांगली लागली असेल. कदाचित आज उठताही आले नसेल. अशा लोकांसाठी एक गोष्ट खुप चांगली. ती म्हणजे, 'ये कह कहकर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं। '

अशी शेरोशायरी करत मोदींनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोमणे मारले.

राहुल गांधी काय म्हणाले?

भारत जोडो यात्रेतून संपूर्ण भारत भ्रमंती करून आलेल्या राहुल गांधी यांनी काल लोकसभेत दमदार भाषण केलं. लोकसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. मोदी-अदानी यांचे नेमके संबंध काय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देशाला जाणून घ्यायचंय, असं राहुल गांधी म्हणाले.

अदानींची भारताबाहेर शेल कंपनी आहे. ही शेल कंपनी कुणाची आहे? हजारो कोटी रुपये शेल कंपनी भारतात पाठवतेय, हा पैसा कुणाचा आहे? अदानी हे काम मोफत करत आहेत का? संदर्भात भारतीय कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही का? हे कोण लोक आहेत? ह्या कोणाच्या कंपनी आहेत… याचं उत्तर मिळायला हवं, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानींसोबत विदेशात जात होते. मात्र आता गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने विदेशात जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com