वाराणसी - ‘जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये असून देशाने स्वतःचे हितसंबंध जपण्याला प्राधान्य द्यायला हवे,’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आज ‘स्वदेशी’चा नारा दिला. ‘नागरिकांनी स्वदेशीचा स्वीकार करण्याबरोबर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, तीच खरी देशसेवा आहे,’ असे आवाहन त्यांनी केले. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले.