शीखांच्या मनात गैरसमज पसरवला जातोय; पंतप्रधान मोदींचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 8 February 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना टोमणेही मारले. पंजाबमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी शीखांच्या मनात गैरजमज भरवला जात असल्याचा आरोप केला आहे. देश प्रत्येक शीखांचा आदर करतो. मला पंजाबची रोटी खायला मिळाली आहे. मी भाग्यवान आहे. पण काही लोक त्यांची दिशाभूल करत आहेत, ते योग्य नाही, असं मोदी म्हणाले. 

ओपन चँलेज; 'हिंमत असेल तर मी खलिस्तानी नाही हे एकदा म्हणून दाखव' 

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच देशात सध्या आंदोलन करण्याची फॅशन आली असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या देशात एक नव्या प्रकारची जमात तयार होत आहे. हे आंदोलनजीवी जमात असून आंदोलन केल्याशिवाय जगूच शकत नाही. वकीलांचं , विद्यार्थ्यांचं कुणाचं ही आंदोलन असो हे तिथंच असतात. हे आंदोलनजीवी लोकांना ओळखायला हवं. देश आंदोलनजीवी लोकांपासून वाचो. हे सगळे आंदोलनजीवी परजीवी असतात, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बोचरी टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. काही लोक जाणूनबुजून कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. शेतकरी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी आता यू-टर्न घेतला आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.  

उत्तराखंड आपत्ती : जाणून घ्या महत्त्वाचे 10 अपडेट्स 

फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडॉलॉजी पासून वाचायला हवं. यासाठी आपल्याला जागृत रहायला हवं, असं म्हणत मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर भाष्य केलं. विरोधक कोणत्याही मुद्द्यांवर विरोध करत आहे. विरोध करण्यात काही गैर नाही, पण देशाला तोडणाऱ्या मुद्द्यांविरोधात तरी त्यांनी एकजूट राहायला हवं, असं ते म्हणाले. आपल्या देशाच्या विकासासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मूल्य आहे. आत्मनिर्भर भारताच हा महत्वपूर्ण स्तंभ आहे. गाव आणि शहरातील दरी कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi farmer protest punjab farm law sikh