
मोदींनी दिलं जर्मनीच्या चान्सलरला अनोखं भारतीय बनावटीचं गिफ्ट
Narendra Modi Germany Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय विदेश दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसात ते युरोपातील जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांना भेटी देणार होते त्यामध्ये काल त्यांनी जर्मनीली भेट दिली आहे. त्यांनी जर्मनीचे चान्सलर Olaf Scholz यांच्याशी दोन्ही देशांच्या संबंधाबाबत चर्चा केली आहे.
जर्मन चान्सलरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक भेट दिली आहे. ती एक भारतीय भेट असून सेदाली (Sedali) नावाची भेट त्यांनी दिली आहे. सेदाली हे गुजरातमधील पारसी समुदायाकडून बनवलं गेलेलं शिल्प आहे. ही हस्तकला तयार करण्यासाठी उच्च कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये लाकूड आणि भौमितीक नमुन्याचा वापर केला जातो.
हेही वाचा: राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा येणार? BMC ने पाठवली नोटीस
ही वस्तू बनवण्यासाठी लाकडावर शानदार नक्षीकाम केलं जातं. त्यांनंतर लाकडाला छोट्या छोट्या पातळ तुकड्यात कापले जाते. त्या तुकड्यांना विशिष्ठ आकारामध्ये एकमेकांना जोडले जाते. हे काम करण्यासाठी ज्याला या कामाचा खूप दिवस अनुभव आहे असा अनुभवी व्यक्ती लागतो. त्यानंतर बनवलेल्या आकारावर परत नक्षीकाम केले जाते. गुजरातमध्ये असे शिल्प बनवणारे लोक इराणमधील रहिवाशी आहेत. ते तेथील आत्याचाराला कंटाळून भारतात पळून आल्याचं सांगितलं जातं. ईराणमध्ये अजूनही अश्या प्रकारचे हस्तशिल्प बनवले जातात.
हेही वाचा: शाळा सुरु होताच मुलांना मिळणार दोन गणवेश! राज्याकडून २१५ कोटींचा निधी
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसांच्या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असून डेन्मार्क, फ्रान्स आणि जर्मनी या तीन देशांना ते भेट देणार आहेत. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे देशांतर्गत संबंध टिकून राहावेत यावर ते चर्चा करणार आहेत.
Web Title: Pm Narendra Modi Gift Germany Chancellor Indian Sedali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..