Gujrat Election: निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी केले, 7200 कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujrat Election

Gujrat Election: निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी केले, 7200 कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी गुजरात दौरा केला. दौऱ्यावेळी मोदींनी गुजरातमधील बनासकांठा येथे रोड शो केला. त्यानंतर अंबाजी मंदिरात जावून दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबाजीत 7200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्यावेळी मोदी म्हणाले की, नवरात्रीच्या काळात अंबाजीमध्ये येणे माझे सौभाग्य आहे.

येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पांचा येथील भागावर चांगला परिणाम होणार आहे. मोदींनी अंबाजीमध्ये 45,000 घरांचे उद्घाटन केले, आणि घर मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले देशातील 80 कोटींहून अधिक नागरीकांना दिलासा देणाऱ्या मोफत रेशनया योजनेवर केंद्र सरकार सुमारे 4 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये दीड लाख घरे पूर्ण झाली आहेत.

महिलांना स्वयंपाक करताना अडचण येवू नये म्हणून सरकारने मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवला आहे. याचा फायदा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. योजनेवर केंद्र सरकार सुमारे 4 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. पंतप्रधान मोदींनी अंबाजीतील जाहीर सभेत म्हणाले तरंगा-अंबाजी-आबू रोड रेल्वे मार्गाची संकल्पना ब्रिटिश सरकारच्या वेळची होती, मात्र स्वातंत्र्यानंतर ही अनेक वर्षे हा प्रकल्प राबवला गेला नाही.