Teachers Day : ज्यांनी 250 वर्षे राज्य केलं, आज ते मागे पडलेत - PM मोदी

pm narendra modi interacts with national award winning teachers on teachers day 2022
pm narendra modi interacts with national award winning teachers on teachers day 2022esakal

आज शिक्षक दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. यादरम्यान तरुण मन घडवल्याबद्दल आम्ही शिक्षकांचे आभारी आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले आहेत.

यावर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या शिक्षकांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे सध्याचे राष्ट्रपती देखील एक शिक्षक आहेत हे आमचे भाग्य आहे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य शिक्षक म्हणून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवी स्वप्ने, नवे संकल्प घेऊन देश आज अशा वळणावर उभा आहे, की आजची पिढी, जे विद्यार्थी अवस्थेत आहेत, त्यांच्यावर 2047 मध्ये भारत कसा बनेल हे अवलंबून आहे, त्यांचे जीवन तुमच्या शिक्षकांच्या हाती आहे. 2047 मध्ये देश कसा असेल ते घडवण्याचे काम सध्या जे शिक्षक आहेत, जे येत्या 10-20 वर्षांसाठी सेवा देणार आहेत त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवण्यात आपल्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, शिक्षकाचे काम केवळ वर्ग घेणे किंवा शाळेचे काम करणे आहे असे नाही. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे काम आहे. त्यांचे राहणीमान सुधारणे आणि त्यांना चांगले नागरिक बनवणे हेही शिक्षकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी मुलांशी नाते निर्माण करावे लागेल. यातूनच भविष्यातील नेते तयार होतील. विद्यार्थ्यांच्या मनातील दुविधा दूर करण्याचे काम शिक्षक उत्तम पद्धतीने करू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. शिक्षक या नात्याने आपण विद्यार्थ्यांशी केवळ वर्गातच नव्हे तर त्यांच्या घरीही संपर्क प्रस्थापित केला पाहिजे. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार त्यांनी सूचना द्याव्यात, असे पंतप्रधान म्हणाले.

pm narendra modi interacts with national award winning teachers on teachers day 2022
Cyrus Mistry Death : कारच्या एअरबॅग्जही उघडल्या, मात्र...; समोर आले PHOTOS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात यशस्वी शिक्षक होण्याचे गुणही सांगितले. पीएम म्हणाले की, यशस्वी शिक्षक तो असतो ज्याच्या मनात विद्यार्थ्याबद्दल पसंत आणि नापसंतीची भावना नसते. वर्गात त्यांची स्वतःची मुले असली तरी. कोणाशीही भेदभाव करू नका. शिक्षक एकोप्याने काम करतात. त्यांना प्रत्येक विद्यार्थाची काळजी असावी, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. पंतप्रधान म्हणाले की, हे स्थान मिळवणे विशेष आहे कारण ज्यांनी आपल्यावर 250 वर्षे राज्य केले त्यांना आम्ही मागे सोडले आहे.

मोदी म्हणाले की, आर्थिक क्षेत्रात सहाव्या क्रमांकावरून पाचवर येण्यापेक्षा जास्त आनंद हा झाला की, ज्यांनी आपल्यावर 250 वर्षे राज्य केले त्यांना मागे सोडले. पीएम मोदी म्हणाले की हे पाच मोठे विशेष आहेत. ही भावना महत्वाची आहे. मोदी पुढे म्हणाले की, संकल्प करा - मी माझा देश सोडणार नाही. हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून आपण बाहेर आलो आहोत आणि आता थांबणार नाहीत.

pm narendra modi interacts with national award winning teachers on teachers day 2022
Liz Truss : ऋषी सूनक यांना मागे टाकत लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com