PM Narendra Modi : ‘ट्विटर’वर नरेंद्र मोदी लोकप्रिय राजकीय नेते

बराक ओबामा प्रथम; एलॉन मस्क, जस्टिन बिबर, रोनाल्डो पहिल्या दहा क्रमांकात
PM Narendra Modi is popular political leader on Twitter Barack Obama  Elon Musk Justin Bieber Ronaldo top ten list
PM Narendra Modi is popular political leader on Twitter Barack Obama Elon Musk Justin Bieber Ronaldo top ten list sakal

नवी दिल्ली : कमी शब्दांत प्रभावी लेखन हे वैशिष्ट असणाऱ्या ट्विटर या सोशल मीडियावरील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव झळकले आहे. मोदी यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे आहेत.

जगभरातील नेते, कलाकार, उद्योगपती, विद्वान लोक या माध्यमातून त्यांची मते ट्विटद्वारे व्यक्त करीत असतात अन त्यांचे चाहते त्यांना फॉलो करतात. जानेवारी २०२३मध्ये ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर असणाऱ्या दहा जणांची नावे ‘स्टॅटिस्टा डॉट कॉम’ (statista.com) या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत.

त्यात गायक, कलाकार, खेळाडू यांच्यासह बराक ओबामा आणि मोदी या दोनच राजकीय नेत्यांची नावे आहेत. मोदी यांचे नाव यादी आठव्या क्रमांकावर आहे. ट्विटरचे नवे मालक व ‘टेस्ला’ या इलेक्ट्रॉनिक मोटार कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचाही समावेश आहे.

यादीत तिसऱ्या क्रमांकावर प्रसिद्ध पॉप गायर जस्टिन बिबर, चौथ्यावर अमेरिकी गायिका व गीतकार केटी पेरी यांचे नाव आहे. मूळची बार्बाडोसची अमेरिकी गायिका रिहानाचा पाचवा क्रमांक असून सर्वांत लोकप्रिय फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सहावा आहे.

त्यानंतर सात ते नऊ स्थानी अनुक्रमे अमेरिकी गायिका टेलर स्विफ्ट, नरेंद्र मोदी, गायिका लेडी गागा यांची नावे आहेत. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सर्वाधिक वापर होणारे ‘यूट्युब’ या समाजमाध्यमाला दहाव्या क्रमांक मिळाला आहे.

ट्विटरवर यांना सर्वाधिक फॉलोअर

  • बराक ओबामा - १३३.६४

  • एलॉन मस्क - १२७.१३

  • जस्टिन बिबर - ११३.८१

  • केटी पेरी - १०८.९२

  • रिहान - १०८

  • ख्रिस्तियानो रोनाल्डो - १०७.५२

  • टेलर स्विफ्ट - ९२.८७

  • नरेंद्र मोदी - ८६.७

  • लेडी गागा - ८५.१४

  • यूट्युब - ७८.६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com