esakal | PM मोदी जवानांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी सीमेवर; चीन-पाकिस्तानला दिला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi jaisalmer main.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमा सुरक्षा दल आणि भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानमधील जैसलमेर येथील लोंगेवाला सीमेवर पोहोचले आहेत.

PM मोदी जवानांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी सीमेवर; चीन-पाकिस्तानला दिला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जैसलमेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमा सुरक्षा दल आणि भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानमधील जैसलमेर येथील लोंगेवाला सीमेवर पोहोचले आहेत. तिथे ते जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 1971 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या लोंगेवाला येथील ऐतिहासिक युद्धाचे स्मरण केले. भारतीय जवानांनी येथे इतिहास लिहिला होता. या युद्धाने भारतीय सैन्य दलासमोर कोणतीही शक्ती टिकणार नाही, हे सिद्ध करुन दाखवले होते. 

त्यांच्याबरोबर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत, लष्कर प्रमुख एमएम नरवणे, नौदल प्रमुख आरकेअस भदौरिया आणि बीएसएफचे प्रमुख राकेश अस्थाना ही उपस्थित आहेत. 

काय म्हटलं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात...

देशाच्या सीमेवर जर एका चौकीचे नाव सर्वाधिक स्मरणात राहत असेल तर ती चौकी आहे, लोंगेवाला चौकी. या चौकीवर तुमच्या सहकाऱ्यांनी शौर्याची अशी गाथा लिहिली आहे की प्रत्येक भारतीयांमध्ये उत्साह संचारतो. जेव्हा भारतीय सैन्याच्या पराक्रमाची चर्चा होईल, सैन्य कुशलतेबाबत लिहिले जाईल, तेव्हा 'बॅटल ऑफ लोंगेवाला'ची आठवण केली जाईल.  

जगातील कोणतीही ताकद आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्या त्या शौर्याला नमन करताना आज भारताचे 130 कोटी देशवासी तुमच्याबरोबर उभे आहेत. आज भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या सैनिकांच्या ताकदीवर आणि शौर्यावर अभिमान आहे. 

आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींनी त्रस्त आहे. विस्तारवाद ही एका पद्धतीची मानसिक विकृती आहे आणि 18 व्या शतकातील विचार दर्शवते. याच विचारांविरोधात भारतही प्रखर विरोध करत आहे.