PM मोदींच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हाही ते..; VHP नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण I Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hiraben Modi Passes Away Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं काल निधन झालं आहे.

Narendra Modi : PM मोदींच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हाही ते..; VHP नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण

Hiraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी यांनी काल पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते.

काल (शुक्रवार) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली होती. दरम्यान, आईच्या निधनानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. काल आपल्या आईचं अंतिम संस्कार केल्यानंतर, मोदी कामावर रुजू झाले आणि त्यांनी कोलकाता वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेची माफीही मागितली आणि वैयक्तिक कारणांमुळं मी तिथं येऊ शकत नसल्याचं सांगितलं.

हेही वाचा: Heeraben Modi Demise : आईचा आशीर्वाद घेण्यासाठी PM मोदींनी प्रत्येकवेळी घेतली भेट; मायेचा दिसला आदर

पंतप्रधान मोदींची ही कर्तव्यदक्षता देशानं पहिल्यांदाच पाहिली असेल, पण 1989 मध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं, तेव्हाही ते कर्मयोगीप्रमाणं त्यांच्या कामात व्यस्त होते. विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) सरचिटणीस दिलीप त्रिवेदी यांनी नरेंद्र मोदींच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्या दिवसाची पुन्हा आठवण करुन दिलीये. त्यावेळीही मोदी अंत्यसंस्कारानंतर अहमदाबादमध्ये पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित होते.

हेही वाचा: Narendra Modi : असा असावा 'कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान'! आईच्या निधनानंतरही PM मोदींनी केली कामाला सुरुवात

त्रिवेदी पुढं सांगतात, 'पंतप्रधान मोदींच्या वडिलांचं निधन झालं. त्या दिवशी अहमदाबादमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार होती. आम्हा सर्वांना वाटत होतं की, नरेंद्र मोदी या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत; पण अंत्यसंस्कारानंतर मोदींनी सभेला हजेरी लावल्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.'

हेही वाचा: Heeraben Modi Demise : PM मोदींच्या आई तब्बल 100 वर्षे जगल्या; काय होतं त्यांच्या तब्येतीचं रहस्य?

त्या भेटीनंतर मोदींसोबत झालेल्या संभाषणाची आठवणही त्रिवेदींनी करुन दिली. अशा परिस्थितीत बैठकीला येण्याचं कारण विचारलं असता, पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितलं की, मी माझ्या पक्षासाठी माझी जबाबदारी पार पाडली. सर्व कार्यकर्त्यांसाठी हा प्रेरणादायी क्षण होता. कारण, आपण आपल्या जबाबदाऱ्यांना शरण जाणं आवश्यक आहे, असंही त्रिवेदी म्हणाले.

टॅग्स :GujaratNarendra Modi