esakal | अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले : नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पाण्याचे संकट हे सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. न्यू इंडियामध्ये आपल्याला पाण्याच्या समस्येशी लढाई करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. यासाठी आमचे सरकार पाच स्तरांवर काम करत आहे. 2024 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचा आमचा उद्देश आहे. एका महत्त्वपूर्ण योजनेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले : नरेंद्र मोदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाणी हा विषय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या खूप जवळचा होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (बुधवार) विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अटल भूजल योजनेचा शुभारंभ केला. मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. तसेच मनाली ते लेहला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला अटल बोगदा असे नाव देण्यात आले आहे. आज वाजपेयींची 95 जयंती असून, त्यानिमित्त अटलस्थळ येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती.

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

मोदी म्हणाले, की पाण्याचे संकट हे सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. न्यू इंडियामध्ये आपल्याला पाण्याच्या समस्येशी लढाई करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. यासाठी आमचे सरकार पाच स्तरांवर काम करत आहे. 2024 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचा आमचा उद्देश आहे. एका महत्त्वपूर्ण योजनेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. आम्ही जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे. जमिनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी अटल भूजल योजनेमार्फत काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. सात राज्यांतील 78 जिल्ह्यांतील 8300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती भागातील भूजल स्थिती गंभीर आहे.