Video : जेव्हा पंतप्रधान मोदींचा तोल जातो अन्...

वृत्तसंस्था
शनिवार, 14 डिसेंबर 2019

बोटीतून केली सफर

गंगा कौन्सिलचे नेतृत्त्व

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) कानपूर दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गंगा घाटला भेट दिली. मात्र, जेव्हा मोदी तेथील पायऱ्या चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि अडखळून ते खाली पडले. मात्र, सुरक्षारक्षकांनी वेळीच त्यांना सावरले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील नमामी गंगा प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गंगा किनारी अटल घाटावरील पायऱ्यांवरून जात होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. त्यामुळे त्यांना यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी कानपूरच्या चकेरी विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. 

बोटीतून केली सफर

पंतप्रधान मोदी हे बोटीच्या माध्यमातून गंगा नदीवर पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश राज्यातील वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

आणखी वाचा - राष्ट्रवादीला आणखी एक मंत्रिपद? अजित पवारांचे संकेत

गंगा कौन्सिलचे नेतृत्त्व

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय गंगा कौन्सिलची आज बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते उपस्थित होते. तसेच त्यांनी या बैठकीनंतर नमामी गंगा प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi lost Balance on Ganga Ghat in Kanpur