
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेकडून सूचना मागवल्या होत्या.
कलम 21 रद्द करण्यात आलं, त्यावेळी भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला : मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला 'मन की बात'व्दारे (mann ki baat) संबोधित करत आहेत. मन की बातचा हा 90 वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. तुमच्याकडंही काही सूचना असतील, तर तुम्ही नमो अॅपद्वारे देऊ शकता.
यापूर्वी 89 व्या भागामध्ये पंतप्रधान मोदींनी देशाच्या युनिकॉर्नबद्दल तपशीलवार माहिती दिली होती. त्याची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याचा अभिमानही व्यक्त केला. पीएम मोदी म्हणाले होते, 'या युनिकॉर्नचं एकूण मूल्य $330 अब्ज पेक्षा जास्त आहे.' आज पुन्हा मोदींनी आपल्या जनतेशी संवाद साधलाय.
हेही वाचा: योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
मोदी म्हणाले, या कार्यक्रमात आपण सर्वजण एकमेकांच्या प्रेरणादायी प्रयत्नांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करू, जनआंदोलनाद्वारे परिवर्तनाची कहाणी सांगू, 'मन की बात'साठी मला तुम्हा सर्वांकडून अनेक पत्रं मिळाली आहेत, यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे.
१९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यात देशातील नागरिकांकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले. त्यावेळी कलम २१ रद्द करण्यात आलं होतं. त्यावेळी भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला. देशाची न्यायालये, प्रत्येक घटनात्मक संस्था, प्रेस या सर्वांवर नियंत्रण होतं. सेन्सॉरशिपची अशी स्थिती होती की, मंजुरीशिवाय काहीही छापता येत नव्हतं, असंही मोदींनी सांगितलं.
हेही वाचा: Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्येही आमच्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले. या खेळांमध्ये एकूण 12 विक्रम मोडले गेले आहेत. इतकेच नाही, तर महिला खेळाडूंच्या नावावर 11 विक्रम नोंदवले गेले आहेत. नीरजनं तर फिनलंडमध्ये रौप्यपदक जिंकून स्वत:चाच विक्रम मोडलाय. जेव्हा देशातील तरुण आकाशाला भिडायला तयार आहेत, तेव्हा आपला देश मागं कसा राहणार? असं मोदी म्हणाले.
Web Title: Pm Narendra Modi Mann Ki Baat 90th Edition Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..