Narendra Modi : मला शिव्या घालण्यासाठी रामायणातून रावण आणला; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi and Mallikarjun Kharge

Narendra Modi : मला शिव्या घालण्यासाठी रामायणातून रावण आणला; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी गुजरातमधील कलोल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावणाबाबत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. (pm narendra modi news in Marathi)

हेही वाचा: Government Scheme : आंतरजातीय विवाह करणार तर लखपती होणार! काय आहे सरकारची स्कीम

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रावणाच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेस पक्षाला रामसेतूचाही तिटकारा आहे. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचा अवमान करण्यासाठी कोण सर्वाधिक शिव्या देऊ शकेल, याबाबत स्पर्धा लागली आहे. मला शिवीगाळ करण्यासाठी रावणाला रामायणातून आणले. रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे,' असे सांगून ते म्हणाले की, जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल.

'काही दिवसांपूर्वी एका काँग्रेस नेत्याने मोदी कुत्र्याप्रमाणे मरतील, असं म्हटलं होतं, तर दुसऱ्या नेत्याने मोदी हिटलरसारखे मरतील, असे म्हटले होते. कुणी रावण म्हणतो, तर कुणी झुरळं म्हणतात,' असं सांगतानाच, 'गुजरातने मला जी ताकद दिली आहे, त्यामुळे काँग्रेस त्रस्त आहेत. या निवडणुकीत आम्ही मोदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असे काँग्रेसच्या एका नेत्याने येथे येऊन सांगितले. आणखी काही सांगण्याची गरज भासली असे म्हणून त्यांनी खर्गे यांना येथे पाठविल्याचं मोदी म्हणाले.

हेही वाचा: Gram Panchayat Election : निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हॅंग; शासनाचा उमेदवारांना दिलासा

खर्गे यांचा मी आदर करतो, पण त्यांना जे सांगण्यात आलं तेच त्यांना बोलावं लागलं असावं. गुजरात हे रामभक्तांचे राज्य आहे, हे काँग्रेसला माहीत नाही, असंही मोदी म्हणाले. मोदी हे 100 डोक्याचे रावण आहेत," अशी टीका खर्गेंनी केली होती.

हेही वाचा आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....