मोदींनी केली राफ्टींग, तर थंड पाण्याने ग्रिल्सची अवस्था वाईट

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या.

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. 

फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी राफ्टच्या माध्यमातून नदी पार केली. ग्रिल्स या दरम्यान राफ्ट ओढताना दिसत होता. हिमालयातील थंड पाण्यामुळे ग्रिल्सची अवस्था वाईट झाली होती. निसर्गाविरोधात तुम्ही वागाल, तर तुम्हालाही निसर्ग स्वीकारणार नाही, असे मोदींनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi participate ManVSWild Programme