Video : मोदींनी चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर केली स्वच्छता

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

मोदींनी आज सकाळी ट्विट करत मामल्लपुरम किनाऱ्यावर स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी सुमारे तीस मिनिटे किनाऱ्यावर फिरत स्वच्छता केली. मोदींसोबत ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधील जयराज या कर्मचाऱ्यांनीही त्यांना मदत केली.

चेन्नई : देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) सकाळी मामल्लपुरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वतः स्वच्छता केली. त्यांनी किनाऱ्यावरील प्लॅस्टिकचा कचरा स्वच्छ केला.

मोदींनी आज सकाळी ट्विट करत मामल्लपुरम किनाऱ्यावर स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी सुमारे तीस मिनिटे किनाऱ्यावर फिरत स्वच्छता केली. मोदींसोबत ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधील जयराज या कर्मचाऱ्यांनीही त्यांना मदत केली. मोदींनी गोळा केलेला कचरा जयराज यांच्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवून आपण आपण निरोगी राहिले पाहिजे असा संदेश त्यांनी दिला आहे. 

चेन्नईत आलेल्या शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी खास दाक्षिणात्य पदार्थांची मेजवानी देणार असल्याचे कळते. त्यात प्रसिद्ध सांबार आणि रस्सम या पदार्थांचा समावेश असेल. मसूर, काही खास मसाले आणि नारळापासून बनविण्यात येणारे 'अरचूविट्टा सांबार' आणि टोमॅटो, चिंच व काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणारे "थक्काली रस्सम' हे दोन पदार्थ मेजवानीत असतील. गोड म्हणून हलवा देण्यात येणार आहे. दाक्षिणात्य मांसाहारी पदार्थही मेजवानीत असतील, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Plogging at a beach in Mamallapuram