PM Modi: चित्त्यांचं कौतुक सोडा; त्यांचे फोटो काढणाऱ्या मोदींच्या कॅमेऱ्याची किंमत ऐकलीत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
PM Modi: चित्त्यांचं कौतुक सोडा; त्यांचे फोटो काढणाऱ्या मोदींच्या कॅमेऱ्याची किंमत ऐकलीत का?

PM Modi: चित्त्यांचं कौतुक सोडा; त्यांचे फोटो काढणाऱ्या मोदींच्या कॅमेऱ्याची किंमत ऐकलीत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त नामिबियातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातल्या कुनो अभयारण्यात या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे. त्यांचे फोटो काढण्याचा मोह पंतप्रधान मोदींनाही आवरता आला नाही. त्यामुळे तेही कॅमेरा घेऊन या चित्त्यांचे फोटो काढू लागले. त्याचीच कालपासून चर्चा होत आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: मोदींनी लेन्सचं कव्हर न काढताच चित्त्यांचे फोटो काढले? PHOTO व्हायरल

पंतप्रधान मोदींनी ज्या व्यावसायिक कॅमेऱ्याने चित्त्यांचे फोटो काढले, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? या लेखातून त्यांच्याविषयी जाणून घ्या. साधारण डीएसएलआर कॅमेऱ्याची लेन्स खूपच लहान असते. पण मोदींच्या कॅमेऱ्याची लेन्स खूप मोठी आणि जड होती. अशा प्रकारची लेन्स लांब अंतरावरचे शॉट्स घेण्यासाठी वापरली जाते. वन्यजीव छायाचित्रकार सामान्यतः अशी लेन्स वापरतात, जेणेकरून त्यांना फोटोसाठी प्राण्यांच्या जास्त जवळ जावं लागत नाही.

हेही वाचा: PM Modi Birthday: पंतप्रधान जेव्हा फोटोग्राफर बनतात

याची साधारण किंमत काय असते?

सध्या डीएसएलआर कॅमेऱ्याच्या किमती ५० हजार ते एक लाखांच्या घरात आहेत. पण लेन्सच्या किमती कॅमेऱ्यापेक्षाही खूप जास्त आहे. साधारण एक लाख ते ५ लाखांच्या घरात या लेन्सच्या किमती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही लेन्सही साधारण याच दराची असणार आहे. प्रत्येक ब्रँडनुसार, लेन्सच्या किमती बदलत असतात. शिवाय कॅमेऱ्यासोबत येणाऱ्या लेन्स, वेगळ्या घ्याव्या लागणाऱ्या लेन्स, त्यांची क्षमता या सगळ्यावरही किमती अवलंबून असतात.

Web Title: Pm Narendra Modi Professional Camera Photography Cheetah Namibia Madhya Pradesh Kuno Sanctury

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..