esakal | मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi, Arun Jaitley

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

जेटलींच्या निधनानंतर ट्विट करत मोदींनी म्हटले आहे, की जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते. 

loading image
go to top