मोदी म्हणाले, 'लाठ्या खायला पाठ कडक करून घेतो'

pm narendra modi reaction rahul gandhi lathi marenge speech
pm narendra modi reaction rahul gandhi lathi marenge speech

नवी दिल्ली : रोजगाराशिवाय हा देश पुढं जाणार नाही आणि रोजगार दिला नाही तर, देशातील तरुण तुम्हाला काठ्यांनी बडवेल, अशी टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिले आहे. लोकसभेत आज, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांचाही समाचार घेतला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केली होती.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रान उठवलं होतं. त्यात त्यांनी रोजगाराचा मुद्दा उपस्थित करताना, 'जर, तरुणाच्या हाताला काम दिलं नाही तर, तरुण लाठ्या हाणतील,', असा टोला राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लगावला. अमित शहा यांचे भाषण म्हणजे कोंडाळा असतो. तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकू नका, असा सल्लाही राहुल यांनी जनतेला दिला होता. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना उत्तर दिले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच पंतप्रधान मोदींनी हे उत्तर दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझी लाठ्या खाण्याची तयारी आहे. मी सहा महिने सूर्यनमस्कार घालून माझी पाठ लाठ्या खाण्यासाठी कडक करून घेईन.'

पंतप्रधान मोदी म्हणाले

  • विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत
  • विरोधकांच्या टीकेचं स्वागतच करू
  • जगाची अर्थव्यवस्था घसरत आहे, त्याचा भारताला फायदा
  • देशात शेतकरी-दलाल ही साखळी संपुष्टात
  • शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा आमचा प्रयत्न

काय म्हणाले होते राहुल गांधी?
आत्ता जे नरेंद्र मोदी भाषण देत फिरत आहेत. सहा महिन्यांनंतर त्यांना घरातून बाहेर पडणं अवघड होऊन बसेल. भारतातील तरुण अशा लाठ्या हाणतील आणि त्यांना सांगतील की हिंदुस्तानच्या तरुणांच्या हाताला काम दिल्याशिवाय हा देश पुढं जाणार नाही. 
- राहुल गांधी, नेते, काँग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com