दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोदींचे वाराणसीतून उत्तर 

वृत्तसंस्था
Monday, 30 November 2020

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी वाराणसीत आले आहेत.

वाराणसी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी वाराणसीत आले आहेत. मोदींनी वाराणसी-प्रयागराज राजमार्ग लेन 6 चे लोकार्पण केले. यावेळी मोदींनी कृषी कायद्याविषयी भाष्य केलं. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल. याआधी बाजारपेठेबाहेर आदान-प्रदान बेकायदेशीर होते. आता शेतकऱ्यांना नवीन पर्याय मिळाले असून त्यांचे कायदेशीर संरक्षण होणार आहे, असं ते म्हणाले. 

विरोधक राजकीय स्वार्थापोटी नव्या सुधारणांविरोधात लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. गेले अनेक दशके त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि आताही ते शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करु पाहात आहेत, अशी टीका मोदींनी केली आहे. 
 

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशात एक वेगळा ट्रेंड तयार होताना दिसत आहे. अगोदर सरकार जेव्हा निर्णय घ्यायची, ते काहींना चांगले वाटले नसल्यास त्यावा विरोध व्हायचा, पण आता लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. लोकांमध्ये अपप्रचार केला जात आहे की, पुढे जाऊन वाईट होईल. जे प्रत्यक्षात झाले नाही, पुढे होणारही नाही. पण, लोकांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. कृषी सुधारणासंबंधात असंच काहीतरी पाहायला मिळतं आहे, हे तेच लोक आहेत ज्यांनी अनेक दशके शेतकऱ्यांची फसवणूक केली. 

आमची सरकार बाजापेठांना आधुनिक बनवत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहेत. शेतकऱ्यांचा माल MSP वर विकला जात आहे. पण, काही लोक अफवा पसरवत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी पीएम किसान सन्मान निधीवर प्रश्न उपस्थित केले होते. आपलं राजकारण टिकवून ठेवण्यासाठी काही लोक असं करत आहेत, असं म्हणत मोदींनी टीकास्त्र सोडले. 

छोट्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचत नव्हती. मोठ-मोठ्या योजनांची घोषणा केली जायची, पण त्यांनी स्वत:च मान्य केले होते की 1 रुपयांपैकी फक्त 15 पैसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. शेतकऱ्यांच्या नावे अनुदान देण्यात आले, पण याचा सर्वाधिक फायदा काळाबाजार करणाऱ्यांनी करुन घेतला. आम्ही म्हटलं होतं की यूरियाचा काळाबाजर रोखला जाईल आणि शेतकऱ्यांना पर्याप्त यूरिया दिला जाईल. गेल्या 6 वर्षांत यूरियाच्या किंमती कमी झाल्यात, असंही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi said about farmer protest on farm bill