PM Narendra Modi: ‘आरजेडी’ने जमिनी बळकावल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका, ‘नया बिहार बनायेंगे’ची घोषणा
Bihar Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथील सभेत राजदवर जमीन बळकावल्याचा आरोप करत टीका केली. ‘नया बिहार बनायेंगे’ ही घोषणा दिली. बिहारच्या मागासलेपणासाठी राजद-काँग्रेस जबाबदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मोतिहारी (बिहार) : राजदने बिहारमध्ये गरिबांच्या जमिनी बळकावूनच त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या पक्षाकडून युवकांना नोकरी देण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत केला.