राष्ट्रपिता महात्मा गांधींजींना प्रमुख नेत्यांकडून अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तसेच  विजयघाट येथे जाऊन लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतींनांही अभिवादन केले. आज (बुधवार) लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे.

आज गांधींच्या जयंतीनिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीदेखील महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केलं.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात काँग्रेस आणि भाजपानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काँग्रेसकडून आज देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहेत. यापैकी दिल्लीतल्या पदयात्रेचं नेतृत्व सोनिया गांधी करतील. तर महासचिव प्रियंका गांधी लखनऊमधल्या, राहुल गांधी वर्ध्यातल्या पदयात्रांचं नेतृत्व करणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या आदरांजली वाहून त्यांच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतींना त्यांनी विजयघाट येथे जाऊन अभिवादन केले. आज लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे. यानंतर पंतप्रधान संसदेत जातील. तिथे दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना वंदन करतील. यानंतर मोदी साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी अहमदाबादला रवाना होतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi sonia gandhi manmohan singh pays tribute mahatma gandhi in rajghat