देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM मोदी

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

देशात जे काही आहे त्यावर देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राज्य घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाच्या विकासात AMU च्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यासोबतच त्यांनी  "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" या नाऱ्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. देशात जे काही आहे त्यावर देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राज्य घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे, असे मोदींनी म्हटले आहे. 

यापूर्वी देशात अनेक मुस्लिम मुलींना शाळेतील असुविधेमुळे शिक्षण सोडावे लागायचे.  शौचालय नसल्यामुळे जवळपास 70 मुस्लिम विद्यार्थीनींना शिक्षण सोडायच्या. स्वच्छ भारत मोहिमेनं हे प्रमाण कमी झाले. सध्याच्या घडीला केवळ 30 टक्केच प्रमाण घटल्याचे दिसते, असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला. 

National Mathematics Day: राष्ट्रीय गणित दिवस; जाणून घ्या का साजरा केला जातो

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, समाजात वैचारिक मतभेद असतात. परंतु जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा सर्वांनी एकजूटता दाखवायला हवी. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्व धर्मियांनी एकता दाखवून योगदान देणं गरजेचे आहे. सत्ता ही समाजाचा एक भाग आहे. समाजासाठी आपल्याला सदोदित काम करत रहायचे आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना काही तत्व अडचणीची वाटतात. त्याचा सामना सर्वच समाजाला करावा लागतो. आपल्याला याचे पुढे जाऊन आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठायचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi speech in amu centenary programme live-updates