Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मोदींच्या या तेजस भरारीचे विविध फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

PM Modi in Tejas Jet : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. मोदींच्या या भरारीचे विविध फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी क्रिकेट वर्ल्डकपच्यावेळी नेटकऱ्यांना त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्यावर मिम्स आणि कमेंट्स येत आहेत. (PM Narendra Modi Tejas flight Netizens reacted on modi video)

Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Silkyara Tunnel Collapsed: "अडकलेले 41 कामगार ख्रिसमसपर्यंत घरी येणार"; बचाव पथकातील तज्ज्ञांचा नवा दावा

मिम्स अन् कमेंट्चा पाऊस

तेजस आकाशात झेपावल्यानंतर मोदी बाजुला पाहून टाटा करताना दिसत आहेत. तर त्यांच्या बाजुला सर्वत्र ढग आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी मोदी नक्की कोणाला टाटा करताहेत असे सवाल केले आहेत?

त्याचबरोबर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण मोदी १५,००० फुटांवरुन अदानींना टाटा करत असल्याचं म्हटलं आहे.

मोदी खरोखर ढगांना टाटा करताहेत? असंही एकानं म्हटलं आहे.

महुआ मोईत्रांच्या एका फॅन पेजनं देखील कमेंट केली असून यात मोदी वर कॅमेरामॅनला टाटा करत असल्याचं म्हटलं आहे.

तसेच मोदींना ट्रोल करणाऱ्यांना काही नेटकऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसवर टीका करताना एका युजरनं म्हटलं की, काँग्रेसची आयटी सेल आणि डाव्या विचारांच्या ट्रोलर्सनं मोदींच्या एका व्हिडिओवरुन फेक न्यूज पसरवायला सुरुवात केलीए. यात त्यांनी म्हटलं की, मोदी ढगांना टाटा करताहेत. पण मोदी ढगांना नाहीतर इतर दुसऱ्या तेजस विमानातील पायलटला बघून टाटा करताहेत.

Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
PM Modi Tejas : अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव

मोदींची तेजस भरारी

PM मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली. तसेच तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याचीही त्यांनी यावेळी पाहाणी केली. यावेळी त्यांनी तेजस विमानात बसून आकाशात भरारी देखील घेतली. मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो. प्रत्यक्ष लढाईसाठा वापरलं जाणार तेजस विमान हे सिंगल सीटर आहे.

Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात त्या गोष्टी मी..."; फडणवीसांचा 'त्या' फोटोवरुन टोमणा

कसं आहे जेट विमान?

तेजस हे भारतीय हवाई दलाचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे, संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे. कुठल्याही हवामानात हे विमान यशस्वी उड्डाण करु शकतं. याला LiFT म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर असंही म्हटलं जातं. भारतीय वायुसेनेने HAL ला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील 26 तेजस मार्क-1 आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HAL आता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com