PMAY-G : मोदींनी १.४७ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले ७०० कोटी रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMAY-G : मोदींनी १.४७ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले ७०० कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला.

PMAY-G : मोदींनी १.४७ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले ७०० कोटी

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. १ लाख ४७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअल लाभार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला. पहिला हप्ता ३८ हजार रुपयांचा देण्यात आला आहे. याबाबत लाभार्थ्यांशी बोलताना त्यांच्याकडून कोणी लाच तर घेतली नाही ना असा प्रश्न मोदींनी विचारला.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दुपारी एक वाजता पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना पहिला हप्ता मोदींच्या हस्ते पाठवण्यात आला. एकूण ७०० कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी म्हटलं की, या हप्त्याचे पैसे इतर कुठेही खर्च करू नका, घर बांधा, जसजसे घर बांधाल तुमचे पुढच्या हप्त्याचे पैसेही खात्यावर जमा होतील असं मोदी म्हणाले.

लाभार्थ्यांना घरकुल योजनेत नाव यावं यासाठी तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का असा प्रश्न विचारला. मोदी म्हणाले की, तुमचा हक्क मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे. तसंच कोणीही तुमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. ग्रामसभेत नावाची घोषणा, निष्पक्षपणे सर्व्हे आणि थेट लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. आधीचे सरकार टक्केवारीशिवाय कोणता लाभ देत नव्हते, पण आता तसं नाही असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

loading image
go to top