esakal | लवकर बरे व्हा! PM मोदींकडून मनमोहन सिंगांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

लवकर बरे व्हा! PM मोदींकडून मनमोहन सिंगांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना

लवकर बरे व्हा! PM मोदींकडून मनमोहन सिंगांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं काल बुधवारी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलंय की, डॉ. मनमोहन सिंग हे लवकर बरे व्हावेत, तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय हे मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी एम्समध्ये दाखल झाले आहेत.

loading image
go to top