Hanuman Jayanti 2022 l पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये 108 फुटी हनुमान मूर्तीचं अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi

पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये 108 फुटी हनुमान मूर्तीचं अनावरण

Hanuman Jayanti 2022 : देशभरात आज मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरातमधील (Gujarat) मोरबी येथील भगवान हनुमानच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यावेळी त्यांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, देशभरातील आणि जगभरातील हनुमान भक्त आणि रामभक्तांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानजींच्या १०८ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. आपण शिमल्यात अनेक वर्षांपासून असाच पुतळा पाहतो आणि आज आपण हा दुसरा पुतळा पाहत आहोत असेही ते म्हणाले.

दक्षिणेतील रामेश्वरम आणि पश्चिम बंगालमध्ये आणखी २ मूर्ती बसवण्याचे काम सुरू आहे. हनुमान ही अशी शक्ती आहे ज्याने सर्व जंगलात राहणार्‍या प्रजाती आणि वन बांधवांना आदर देण्याचा अधिकार दिला आहे असेही ते म्हणाले.

Web Title: Pm Narendra Modi Unveiled 108 Feet High Hanuman Statue In Gujrat Video Conference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratNarendra Modi