
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्राला संबोधित करताना पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला. “ऑपरेशन सिंदूर ही फक्त कारवाई नाही, तर भारताची दहशतवादविरोधी नवी नीती आहे,” असं ते म्हणाले. या ऑपरेशनने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. मोदींनी स्पष्ट केलं की, हे ऑपरेशन थांबलं आहे, पण संपलेलं नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर भारताची बारीक नजर असेल.