PM Narendra Modi : हिराबेन यांच्या मृत्यूनंतर PM मोदींची पत्नी नजरकैदेत? व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi Wife
PM Narendra Modi : हिराबेन यांच्या मृत्यूनंतर PM मोदींची पत्नी नजरकैदेत? व्हिडीओ व्हायरल

PM Narendra Modi : हिराबेन यांच्या मृत्यूनंतर PM मोदींची पत्नी नजरकैदेत? व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोदींच्या सांगण्यावरुन आपल्याला नजरकैद करण्यात आलं असल्याचा दावा एक महिला करत आहे. ही महिला पंतप्रधान मोदींची पत्नी असल्याचा दावा करत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक महिला आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. ही महिला गुजरतातीमध्ये बोलत आहे. त्याचा हिंदी अनुवादही व्हिडीओमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

ही महिला म्हणते,"मी जशोदाबेन मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची पत्नी आहे. माझ्या सासूबाईंचं निधन झालं तेव्हा मला वडनगरला जायचं होतं. पण गुजरात सरकारने गांधीनगर, मेहसाणा आणि उंझा पोलिसांनी मला माझ्या घरात नजरकैद करण्याची व्यवस्था केली. जेव्हा मी विचारलं की मला वडनगरला जाण्यापासून का रोखलं जात आहे? तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं की आम्हाला काही माहित नाही. आम्हाला वरुन आदेश आले आहेत. असं उत्तर देऊन ते खरं उत्तर देणं टाळत आहे."

हेही वाचा: Heeraben Modi Demise : मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन; जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!

हा व्हिडीओ कोणता आहे, कधीचा आहे, या व्हिडीओतली महिला नक्की जशोदाबेन मोदी आहे की आणखी कोणी याबद्दल मात्र अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेचा विषयही ठरत आहे.