Sat, Feb 4, 2023

Heeraben Modi Demise : शरद पवारांकडून PM मोदींचं सांत्वन; म्हणाले, "नरेंद्रभाई..."
Heeraben Modi Demise : शरद पवारांकडून PM मोदींचं सांत्वन; म्हणाले, "नरेंद्रभाई..."
Published on : 30 December 2022, 3:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज पहाटे साडेतीनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. त्याबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांचं सांत्वन केलं आहे.
शरद पवार यांनी पहिल्यांदाच मोदींचा उल्लेख नरेंद्रभाई असा केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी मोदींचं सांत्वनही केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये पवार म्हणतात, नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे! त्याबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."