PM-SHRI योजनाला केंद्राची मंजूरी: देशातील 14000 हजार शाळांच रुपडं पालटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM-SHRI

PM-SHRI योजनाला केंद्राची मंजूरी: देशातील 14000 हजार शाळांच रुपडं पालटणार

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज PM-SHRI या योजनाला हिरवी कंधील दाखवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आज PM-SHRI या योजनेचे उद्घाटन केले आहे. या योजनेला PM SHRI शाळा म्हटले जाणार आहे. योजने अंतर्गत, NEP,2020 ची प्रमुख वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 14,000 शाळांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथे जूनमध्ये शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या परिषदेत या योजनेवर प्रथम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेव्हा सांगितले होते की राज्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की नवोदय विद्यालये, केंद्रीय विद्यालये यांसारख्या शाळा PM SHRI "NEP लॅब" म्हणून काम करतील.

NEP विविध टप्प्यात विभागलेला अभ्यासक्रम आणि अध्यापन शैलीमध्ये,मूलभूत, मध्यम आणि उच्चमाध्यमिक,पायाभूत, खेळ यांच्या आधारे आभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. पूर्वतयारीसाठी काही औपचारिक वर्गातील अध्यापनासह काही पाठ्यपुस्तके दिली जातील. विषयांची ओळख मध्यम स्तरावर करायची आहे. दुसरा टप्पा कला आणि विज्ञान किंवा इतर शाखांमध्ये बहु-विषय स्वरूपाचे असेल.

Web Title: Pm Shri Education Scheme National Education Policy School Features Explained

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..