

Street vendors benefit from the PM SVANidhi scheme, which promotes financial inclusion and self-employment across Madhya Pradesh.
esakal
भोपाळ : पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याने ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ आणि ‘सर्वाधिक कर्ज वितरण करणारे राज्य’ या दोन्ही श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. तसेच राज्यातील इंदूर, सारणी आणि बालाघाट या तीन नागरी संस्थांनाही राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले.
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित ‘स्वनिधी सन्मान पुरस्कार-२०२६’ सोहळ्यात मध्य प्रदेशला दोन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे यश मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.