esakal | 'PMOतील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज (सोमवार) सकाळी ट्विट करत हा दावा केला आहे. दिल्लीत सध्या राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) जोरदार आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात ईशान्या दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

'PMOतील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली असून, हे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज (सोमवार) सकाळी ट्विट करत हा दावा केला आहे. दिल्लीत सध्या राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) जोरदार आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात ईशान्या दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारबद्दल देशभर चर्चा होत असून, आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता स्वामी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयासंबंधातच दावा केल्याने खळबळ उडाली आहे. 

स्वामी म्हणाले, की पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे आणि हे अधिकारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. देशभर सीएएविरोधी वातावरण आणि दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे. हिंदुत्व मानसिकता विरोधी अधिकारी हे देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत आहे. हे देशभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू इच्छितात. मात्र त्यांना कारवाई करू दिली जात नाही.