
नवी दिल्ली: मोदी सरकारने तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीवर १५ हजार रुपये देण्यासाठी काम सुरू केले आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल लाईव्ह करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण नोंदणी करू शकतात. ही योजना तीन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात जाहीर केली होती.