निर्दोष असतानाही वडील आणि चुलत्यानं भोगली ३ वर्ष शिक्षा

मेडीकल ऑफिसरची साक्ष ठरली महत्त्वाची
court
courtesakal

POCSO कायद्याच्या केसमध्ये न्यायालयाने दोघा भावांची निर्दोष मुक्तता केलीय. खोट्या आरोपांमुळे अल्पवयीन मुलीच्या वडीलांना आणि चुलत्याला तीन वर्ष कारागृहात काढावी लागली.या प्रकरणातील मुलगी ही आईच्या प्रभावाखाली होती.आई-वडील विभक्त झाले आहेत.

या प्रकरात अल्पवयीन मुलीची आई तक्रारदार होती. तिने सांगितल्यानुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये तिने आणि तिच्या मुलीने घर सोडलं. मुलीवर वडीलांनी आणि चुलत्यांनी वारंवार अत्याचार केल्याने मोठी भांडणं झाली आणि घर सोडलं असं तिने जबाबात म्हंटलं होतं. अल्पवयीन मुलीची आई आणि वडील दोघांचं पटत नव्हतं त्यांची सतत भांडणं होतं. पॉक्सो च्या केसमध्ये लहान मुलांना जबाबासंदर्भात सांगणं, शिकवण ही सामान्य बाब आहे.

आरोपी असलेल्या दोघा भावांनी ( अल्पवयीन मुलीचे वडील आणि चुलते) ३ वर्षे तुरुंगात काढली आहेत. आरोपीच्या वकीलांनी फेरतपासणी तक्रारदार आणि मुलीला बोलावल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. यात मुलगी ही आपल्या आईच्या प्रभावाखाली होती. तसचं आई आणि वडील दोघांचं पटत नव्हतं त्यांची सतत भांडणं होतं होती, ही गोष्ट तिने न्यायलयासमोर मान्य केली नाही. पॉक्सोच्या प्रकरणात पीडीतेला साक्ष देताना शिकवणं,सामान्य बाब मानली जाते. मात्र या प्रकरणात वडील आणि चुलत्यांवर खोट्या आरोपाखाली अडकवलं गेल्याच लक्षात येतंय. तसचं अल्पवयीन मुलीच्या जबाबात बदल आढळू येत असल्याचं निरिक्षण न्यायाधीश प्रितीकिमार घुले यांनी मांडलं.

वडील आणि चुलते वारंवार लैंगिक अत्याचार करत होते, सगळ्यात शेवटी ११ नोव्हेंबर २०१८ मध्ये अत्याचार झाल्याचं अल्पवयीन मुलीने जबाब दिला होता. मात्र मेडीकल रिपोर्टनुसार अल्पवयीन मुलीचे 'हायमेन' सुस्थितीत असल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले हे सिद्ध होत नाही. या प्रकरणात ज्या ऑफिसरने मुलीची वैद्यकीय चाचणी घेतली होती, त्यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यांनी सांगितल्यानुसार दोन व्यक्तींकडून वारंवार लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचे हायमेन सुस्थितीत राहणं शक्य नसून, अशी कोणतीही घटना यापूर्वीही घडलेली नाही. त्यामुळे लैंगिकअत्याचार झाले हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध होतंय. त्यामुळे दोघाही भावांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. धक्कादायक म्हणजे या खोट्या आरोपामुळे वडील आणि चुलत्याने ३ वर्ष तुरुंगात काढली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com