पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा....

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

एका पोलिस हवालदारासह दोघांनी महिलेवर सरकारी निवासस्थानामध्ये सामूहिक बलात्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

पुरी (ओडिशा): एका पोलिस हवालदारासह दोघांनी महिलेवर सरकारी निवासस्थानामध्ये सामूहिक बलात्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

एका बस स्थानकावर महिला बसची वाट पाहत उभी होती. यावेळी एक व्यक्ती जवळ आली व घरी सोडतो म्हणून सांगितले. शिवाय, पोलिस असल्याचे ओळखपत्रही दाखवले. यामुळे महिला विश्वासाने मोटारीत बसली. पुढे आणखी दोघे जण मोटारीत बसले. महिलेला सरकारी निवसस्थानात नेऊन सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार महिलेने दिली आहे.

तक्रारीमध्ये पीडीत महिलेने म्हटले आहे की, 'भुवनेश्वर येथून काकतपूर या माझ्या गावी येण्यासाठी निघाले होते. बस थांब्यावर थांबले असताना एक मोटार माझ्याजवळ येऊन थांबली. पोलिस असल्याचे सांगितल्यामुळे व घरी सोडणार असल्याने मोटारीत बसले. परंतु, त्यांनी झाडेश्वरी क्लबजवळील पोलिस क्वॉर्टरमध्ये मला नेऊन सामूहिक बलात्कार केला. एक जण बलात्कार करत असताना दोघांनी बाहेरून दरवाजा लावला होता. त्याच पद्धतीने अन्य दोघांनीही माझ्यावर बलात्कार केला व दारू पिऊन तेथेच झोपले. बलात्कारावेळी एका पाकिट काढून घेतले होते. खिडकीमधून आवाज देऊन एका व्यक्तीला दरवाजा उघडायला सांगितले व सुटका करून घेतली.'

दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर व पाकिटातील ओळखपत्राचा आधार घेऊन तिघांना अटक केली आहे. त्यामधील एक पोलिस हवालदार असून, त्याला निलंबीत करण्यात आले आहे. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी अशिष कुमार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police and 2 others gangrape woman in govt quarter in Puri