बिल नसल्यानं परदेशी नागरिकाला ओतायला लावली दारु; पोलिस निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल नसल्यानं परदेशी नागरिकाला ओतायला लावली दारु; पोलिस निलंबित

एका पोलिसांच्या पथकाने परदेशी नागरिकाला त्याने खरेदी केलेल्या दारुच्या बाटल्या रस्त्यावरच ओतायला भाग पाडलं.

बिल नसल्यानं परदेशी नागरिकाला ओतायला लावली दारु; पोलिस निलंबित

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोरोनाचे संकट त्यातच लोकांनी सेलिब्रेशनसाठी गर्दी करू नये, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, केरळमध्ये एका पोलिसांच्या पथकाने परदेशी नागरिकाला त्याने खरेदी केलेली दारुची बाटली रस्त्यावरच ओतायला भाग पाडलं. परदेशी नागरिकाने सेलिब्रेशनसाठी एका सरकारी दारुच्या दुकानातून दारु खरेदी केली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेकडं गांभीर्याने पाहत केरळमधील (Kerala) विजयन (P. Vijayan) सरकारने शनिवारी संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणी राज्याच्या पोलिस प्रमुखांकडून अहवाल मागवला आहे. पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियाज यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या पर्यटन क्षेत्राला पुनर्जीवन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असताना अशा घटनांमुळे फटका बसतो. असे कृत्य सहन केले जाणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

एखादा अधिकारी सरकारच्या कामाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. केरळमध्ये पर्यटकांना येण्यास पोषक असं वातावऱण तयार करण्यावर भर राहील असंही पर्यटन मंत्री रियाज यांनी सांगितलं.

परदेशी नागरिकाला दक्षिण केरळमधील कोवलम इथं शुक्रवारी पोलिसांच्या पथकाने अडवलं होतं. त्याच्याकडे असलेली दारुची बाटली रस्त्यावरच रिकामी करण्यात आली. दुचाकीवरून परदेशी नागरिक वेल्लोरमधून निघाला होता. तो दारु खरेदी करून परतत असताना त्याला अडवण्यात आलं होतं.

हेही वाचा: आली लहर केला कहर! लग्नाच्या दिवशी नवरीला खायची होती पाणीपुरी, पण...

पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे दारुच्या बाटल्या मिळाल्या. जेव्हा बिल कुठे आहे असे विचारलं तर परदेशी नागरिक बिल घ्यायला विसरलो असं म्हणाला. तसंच आपण दुकानातून खरेदी केली असल्याचंही सांगितलं आणि बिल देऊ शकतो असंही म्हणाला. तरीही त्याच्याकडील बाटल्या पोलिसांनी रिकाम्या करायला लावल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KeralaIndia
loading image
go to top