तिरंगा डीपी वाद! मोहन भागवत यांना तिरंगा देण्याचा प्रयत्न; पोलिसांनी रोखलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohan bhagwat

तिरंगा डीपी वाद! मोहन भागवत यांना तिरंगा देण्याचा प्रयत्न; पोलिसांनी रोखलं

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना शनिवारी राष्ट्रध्वज देण्यासाठी निघालेल्या मध्य प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या एका गटाला पोलिसांनी वाटेत अडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरही आरएसएसने सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चर म्हणून तिरंगा ठेवा नसल्याचा कथित निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या पाच नेत्यांचा गट येथील एका मॉलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. भागवत संध्याकाळी येथे आरएसएसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करणार होते. (rss chief mohan bhagwat news in marathi)

हेही वाचा: दोषी व्यक्तीला शिक्षण सुरू ठेवण्याचा अधिकार; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

दुपारी साडेचार वाजता मध्य प्रदेश परीक्षा मंडळाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अडवले. प्रदेश काँग्रेसच्या मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा संगीता शर्मा म्हणाल्या, "पोलिसांनी सकाळी 11 वाजल्यापासून आमचा पाठलाग केला. पोलिस आमच्या राज्य कार्यालयाभोवती घिरट्या घालत राहिले. पोलिसांनी आम्हाला सांगितले की भागवत यांना Z+ श्रेणीची सुरक्षा आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही. तसेच पोलिसांनी आम्हाला मध्येच अडवले.

हेही वाचा: Fact Check: RSS ने ५२ वर्षे तिरंगा न फडकवण्याचं कारण देशाचा Flag Code?

भागवत यांना तिरंगा का द्यायचा या प्रश्नावर शर्मा म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून सोशल मीडिया हँडलवर राष्ट्रध्वज डीपी लावण्याचे आवाहन केले होते. मात्र RSS ने आपल्या सोशल मीडियावर प्रोफाइलवर राष्ट्रध्वज डीपी म्हणून ठेवला नाही. शर्मा म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची (भाजप) वैचारिक संरक्षक असलेल्या आरएसएसने 52 वर्षांपासून नागपुरातील मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला नाही.

भोपाळ झोनचे पोलिस उपायुक्त साई कृष्ण थोटा यांनी सांगितले की, "भागवत यांना झेड प्लस सुरक्षा आहे. कोणीही त्यांना अनौपचारिकपणे भेटू शकत नाही. जर कोणी जबरदस्तीने ध्वज देण्याची घोषणा करत असेल तर आम्ही त्याला तसे करू देऊ शकत नाही.

Web Title: Police Stop Congress Leaders Trying To Hand Over The Tricolor To Rss Chief Mohan Bhagwat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..