अडविल्यामुळे 'ती' चक्क पोलिसालाच चावली अन् काढलं रक्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिक जिवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत असले तरी काहीजण मुद्दामही घराबाहेर पडल्याच्या घटना समोर येत आहेत.

कोलकाता : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु असताना कोलकतामध्ये पोलिसांनी एका महिलेला रोखले असता ती चक्क पोलिसालाच चावली अन् रक्त काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिक जिवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत असले तरी काहीजण मुद्दामही घराबाहेर पडल्याच्या घटना समोर येत आहेत. पोलिसांकडून रस्त्यांवर फिरणाऱ्यांना काढ्यांचा प्रसाद मिळताना दिसत आहे. तर, काहीजण पोलिसांशी अरेरावी करत असल्याचे दिसत आहे. 

कोलकतामध्ये असाच प्रकार समोर आला असून, एका महिलेने पोलिस अधिकाऱ्याच्या चावा घेतला. पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने भांडण करण्यात सुरुवात केली आणि पोलिसांच्या पोटाचा चावा घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या महिलेवर टीका केली जात आहे. ही घटना 25 मार्चला घडली आहे. या महिलेने औषधे घेण्यासाठी बाहेर पडल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी बिल दाखवण्यास सांगितल्यानंतर तिनं पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police stops Kolkata woman for defying coronavirus lockdown orders she bites cop