
पोलिसातील देवमाणूस! हातपंप चालवून भागवली कुत्र्याची तहान
सोशल मीडियावर अनेकदा काही मजेशीर तर काही प्रेरणादायक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. यात काही फोटो, व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांचं अशरक्ष: मन जिंकून घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो चर्चेत आला आहे. या फोटोमधून माणुसकीचं दर्शन नेटकऱ्यांना पाहायला मिळालं आहे. वाराणसीमधील एक पोलिस (policeman) ड्युटी बाजवत असतांनाच तहानलेल्या श्वानाला (dog) पाणी (water) पाजत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर कर्तव्य आणि माणुसकी असा दुहेरी संगम दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या पोलिसांची चर्चा होत असून अनेकांनी त्यांना सलाम केलं आहे. (policeman helps street dog to drink water from handpump people loves it)
व्हायरल होत असलेला फोटो वाराणसीमधील असून एक पोलिस ड्युटी बजावत असतांनाच तहानलेल्या श्वानाला पाणी पाजत आहेत. विशेष म्हणजे ते हातपंप चालवून (handpump) त्याला पाणी देत आहेत. हा फोटो आयपीएस अधिकारी सुकिर्ती माधव मिश्रा यांनी शेअर केला आहे. जर कोणत्या व्यक्तीचं कुत्र्यांवर प्रेम असेल तर, ते एक चांगले व्यक्ती असण्याचं लक्षण आहे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, या फोटोमध्ये कुत्रा बोरिंगला तोंड लावून पाणी पित आहे. तर, पोलिसदेखील हातपंप चालवून या कुत्र्याला पाणी पाजत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ११ हजारांपेक्षा जास्त लाइक्स त्याला मिळाले आहेत.