
तिरुअनंतपुरम : स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केल्याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मोदींवर टीका केली आहे. ‘‘महात्मा गांधींच्या हत्येनंतर ज्या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती, त्या संघाला स्वातंत्र्य मिळविण्यसाठी झालेल्या लढ्याचा वारसा बहाल करण्याचा प्रयत्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाची किंमत कमी केली आहे,’’ अशी टीका विजयन यांनी केली.