
नवी दिल्ली : ‘देशाची राज्यघटना आणि सत्ता यापैकी काँग्रेसने नेहमीच सत्तेला प्राधान्य दिले,’ अशी टीका करीत ‘राज्यघटनेचे पावित्र्य भंग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप-रालोआ सरकार वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे,’ अशी ग्वाही आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत बोलताना दिली.