
महाराष्ट्रातल्या राजकारणाचे पडसाद संसदेत वक्फ विधेयकावर झालेल्या चर्चेत उमटले. विधेयकाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवरून सभागृहात आरोप प्रत्यारोप झाले. वक्फ विधेयक आणण्यामागचा हेतू जमीन बळकावण्याचा आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.